किल्ले हडसर एक पावसाळी चढाईचा अनुभव
किल्ले हडसर एक पावसाळी चढाईचा अनुभव जुन्नरचा सातवाहनकालीन नाणेघाट आणि आजूबाजूच्या ज्ञात अज्ञात घाटवाटांच्या संरक्षणासाठी सभोवतालच्या योग्य आणि उंच जागा पाहून बांधलेले पंचपाण्डव म्हणजेच जीवधन, चावंड ,सिंदोळा,निमगिरी आणि हडसर हे पाच किल्ले होय. आम्हाला ह्या पंचपांडवांचे दर्शन करावयाचे होते, त्यावेळी आमचे जुन्नरचे खास मित्र माजी सैनिक व वनरक्षक श्री रमेश खरमाळे सर यांनी आम्हाला सल्ला दिला कि,पावसाळयात हडसर किल्ला करा अतिशय अप्रतिम आहे. खरमाळे सर म्हणजे जुन्नर परिक्षेत्राचा चालताबोलता एनसायक्लोपेडियाच किंवा गूगल मॅपच. जुन्नर परिक्षेत्राची खडा नि खडा माहिती सरांना आहे, येथे कुठे भेट द्यावी ,केव्हा द्यावी,काय पाहावे आणि त्यापेक्षा कोठे जाऊ नये आणि काय करू नये या माहितीचा सर एक खजिनाच आहेत. सर म्हणजे एक अजबच व्यक्तिमत्व आहे. त्यांचे वर्णन करायचे म्हणजे एक स्वतंत्र लेख होईल. आज आपले ध्येय किल्ले हडसर आहे. सरांच्या सल्ल्यावरून रवीवारसाठी किल्ले हडसर चा बेत नक्की करून मी ...